Pune News : पीएमपीएमएलच्या पुणे स्टेशन डेपोत दुमजली विश्रांतीगृह व स्वच्छतागृहाचे भूमिपूजन

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन महामंडळच्या (PMPML) पुणे स्टेशन डेपोत PMP च्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र सुसज्ज दुमजली विश्रांतीगृह आणि दुमजली स्वच्छता गृह बांधण्यात येणार आहे. या कामाचे आज (दि.20) आमदार सुनिल कांबळे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. आमदार कांबळे यांच्या फंडातून पन्नास लाख रूपये कामासाठी खर्च केले जाणार आहेत.

यावेळी पीएमपीएमएलचे वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी चंद्रकांत वरपे, स्थापत्य अभियंता निरंजन तुळपुळे, पुणे स्टेशन डेपो मॅनेजर संजय कुसाळकर, असिस्टंट डेपो मॅनेजर नंदकुमार आठवले, डेपो मेन्टेनन्स इंजिनियर विकास जाधव, पीडब्ल्यूडीचे उपकार्यकारी अभियंता पाटील उपस्थित होते.

आमदार सुनिल कांबळे म्हणाले, ‘पीएमपीएमएलच्या चालक व वाहक यांना कामामुळे ताण येतो. हा ताण घालवण्यासाठी हक्काचे विश्रांतीगृह असावे या हेतूने पुरुष व महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र अशा दुमजली विश्रांतीगृहाची उभारणी पुणे स्टेशन डेपोमध्ये करत आहे. बाहेरगावाहून पुणे स्टेशन डेपोमध्ये कामाला येणाऱ्या कर्मचार्‍यांची देखील या विश्रांतीगृहामुळे चांगली सोय होणार आहे. तसेच प्रवाशी व पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी सुसज्ज व स्वतंत्र अशा महिला व पुरुष दुमजली स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात येणार आहे.’

पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे म्हणाले, ‘पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचे असणारे विश्रांतीगृह व स्वच्छता गृह हे दोन्ही प्रश्न मार्गी लागले आहेत. लवकरच पुणे स्टेशन डेपो हा पूर्णपणे स्मार्ट इलेक्ट्रिक बस डेपो होणार आहे,’ असे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.