Pune News : गुंठेवारीचा निर्णय निवडणुका डोळ्यापुढे ठेवून नाहीच : उपमुख्यमंत्री अजित पवार

एमपीसी न्यूज : आपल्या महापालिकेच्या निवडणुकीला एक वर्ष बाकी आहे. त्यामुळे कुठले पण निर्णय घेतले म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच घेतले असे होत नाही. तसेच राज्यसरकार चालवीत असताना त्या त्यावेळी गुंठेवारीसारखे जे प्रश्न येत असतात तेव्हा निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे प्रश्न सोडवण्याचे नसतात. निवडणुका येतात आणि जात असतात. काहीनी अर्थ काढला की पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतला आहे. त्यामुळे यात काही तथ्य नाही, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

राज्यसरकारने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गुंठेवारीचा निर्णय घेतला गेला असल्याचा आरोप होत होता त्यावर अजित पवार यांनी पडदा टाकला. पुणे विधानभवनात (कौन्सिल हॉल) आढावा बैठकीनंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

नाशिक येथील काही भाजपचे नेते शिवसेनेत आज प्रवेश करीत आहे. तर राष्ट्रवादी काही प्रवेश आहेत का त्यावर अजित पवार म्हणाले, कोणत्या पक्षात कोण प्रवेश करतील हे त्या त्या पक्षाचे प्रमुख, प्रवक्ते आणि मान्यवर समोर येऊन मीडियाला सांगतील. ते काही गप्प बसणार नाही आणि मीडिया ला सांगितल्याशिवाय काही होणार नाही.

तसेच औरंगाबाद नामांतराचा प्रश्न चर्चेत आहे. त्यावर अजित पवार म्हणाले, ज्यावेळी असे प्रश्न निर्माण होतात तेव्हा महाविकास आघाडी सरकार मधील प्रमुख तीन पक्ष आहेत. त्यांनी एकत्रित बसून त्याच्यातून मार्ग काढायचा असतो. आता हा मुद्दा पुढे आला आहे ही वस्तुस्थिती खरी आहे. अनेक मुद्दे पुढे आले आहेत. यापूर्वी देखील मी बोलो आहे की, या तीन ही पक्षाचे सर्वोच्च नेते फार समंजस असून योग्य पद्धतीने निर्णय घेतील. त्या बद्दल माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.