Pune News : दसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्यातील व्यायामशाळा व जीम होणार सुरू !

एमपीसी न्यूज : दसऱ्याच्या मुहूर्तावर पुणे शहरातील व्यायामशाळा व जीम सुरू करण्यासाठी पुणे महापालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी आज (शनिवार) यासंदर्भातील एक आदेश काढला आहे.

नव्या आदेशा नुसार पुणे शहरातील प्रतिबंधित (कंटेंन्मेट झोन) क्षेत्राबाहेरील व्यायामशाळा आणि जिम रविवारपासून (दि.25 ऑक्टोबर) सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सुरू होणार आहेत.

_MPC_DIR_MPU_II

दरम्यान, शहरातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट आणि बार हे 50 टक्के क्षमतेनुसार सकाळी 8 ते रात्री 11.30 वाजण्याच्या दरम्यान सुरू राहणार आहेत. यापुर्वी त्यांना रात्री 10 वाजेपर्यंतच परवानगी दिली होती.

सार्वजनिक आरोग्य विभागाने 23 ऑक्टोबर रोजी काढलेल्या आदेशातील मार्गदर्शक सुचना आणि अटींचे पालन करणे हे सर्वांना बंधनकारक असणार आहे. आयुक्तांनी आज काढलेला आदेश हा पुढील आदेशापर्यंत पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागू राहणार आहे.

वास्तविक पाहता राज्यभरातील व्यायामशाळा व जीम 25 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्यशासनाकडून घोषित केला गेला होता. या निर्णयामुळे जीम व व्यायामशाळेत जाणाऱ्या नागरीकांना दिलासा मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.