Pune News : आपण यांना पाहिलंत का? हरवलेल्या 11 हजार कोरोनाबाधितांचा पुणे महापालिका घेतेय शोध

एमपीसी न्यूज – शहरात कोरोना झपाट्याने वाढत असताना आरटीपीसीआर आणि अँटिजेन चाचण्या वाढवण्यात आल्या होत्या. यामध्ये अनेकांनी नाव, पत्ते, मोबाईल क्रमांक तसेच नातेवाईकांची योग्य माहिती दिली नसल्याने जवळपास 11 हजारांपेक्षा अधिक रुग्ण महापालिकेच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग यंत्रणेला सापडलेच नाहीत.याचा शोध महापालिका घेत आहे.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग यंत्रनेणे हजारो रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा सर्व्हे करून मोठ्या प्रमाणात रुग्ण शोधण्याची जबाबदारी पेलली आहे. मात्र, अनेक रुग्ण आपल्या घरापर्यंत पालिकेची यंत्रणा पोहचू नये, किंवा आपण कोरोना बाधित आहोत, हे इतरांना कळू नये, यासाठी जाणून बुजून चाचणी करताना खोटी व चुकीची माहिती देतात. या माहितीमुळे रुग्णांपर्यंत व त्यांच्या संपर्कात आलेल्यांपर्यंत यंत्रणा पोहचत नाही. परिणामी संसर्ग वाढतो.

कोरोना बाधितांनी चाचणी करताना अपुरी आणि चुकीची माहिती देवू नये, स्वॅब सेंटर किंवा खासगी लॅब चालकांनी व कर्मचाऱ्यांनी रुग्णांची संपूर्ण माहिती घ्यावी, असे वारंवार आवाहन केले आहे. याशिवाय काही खासगी लॅबवर कारवाईही केली आहे. मात्र यामध्ये पहिल्याही आणि दुसऱ्याही लाटेत सुधारणा झालेली नाही.

कोरोना दुसऱ्या लाटेत तब्बल 11 हजार रुग्णांचा महापालिकेला थांगपत्ताच लागला नाही. महापालिकेच्या‌ स्वॅब सेंटरमध्ये किंवा खासगी लॅबमध्ये चाचणी केल्यानंतर पॉझिटीव्ह आलेल्या रुग्ण्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा महापालिकेकडून शोध घेतला जातो. यासाठी पालिकेने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली आहे. यासाठी आरोग्य विभाग शिक्षिक, पीएमपीएमएल कर्मचारी, आंगणवाडी सेविका आदींची मदत घेते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.