-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune News : चांदणी चौक भू संपादनासाठी एचसीएमटीआरचा 24 कोटींचा निधी वळविला !

तब्बल 60 कोटी रुपयांच्या वर्गीकरणाचा स्थायी समिती बैठकीमध्ये निर्णय :

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

  एचसीएमटीआर चे 24 कोटी तर सीएनजी बस खरेदीच्या 36 कोटी रुपयांचे केले वर्गीकरण

एमपीएससी न्यूज : महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक प्रकल्प असलेल्या ‘हाय कपॅसिटी मास ट्रान्जिट रोड’ (एचसीएमटी) अनेक वर्षांपासून रखडला आहे. आज झालेल्या स्थायी समिती बैठकीमध्ये चांदणी चौक उड्डाणपुलासाठीच्या भू संपादनासाठी एचसीएमटीआर साठी राखीव निधीतील 24 कोटी तर सीएनजी बस खरेदीसाठीच्या निधीतील 36 कोटी रुपयांचे वर्गीकरण करण्यात आले. त्यामुळे एचसीएमटीआर प्रकल्प निधी अभावी बारगळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शहराच्या जड वाहतुकीवर पर्याय म्हणून एचसीएमटीआर प्रकल्प राबविला जात आहे. त्यासाठीचे सर्वेक्षण, काही ठिकाणी भू संपादन आणि कोट्यवधींच्या निधीची तरतूद केली गेली आहे. परंतु, प्रत्यक्ष काम सुरू होण्यापुर्वीच निधीला कात्री लागत असल्यामुळे हा प्रकल्प आणखी काही वर्षे रखडत चालला आहे.

या वर्गीकरणा संदर्भात स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले, “राज्यसरकार चांदणी चौक भू संपादनासाठी 185 कोटी रुपये देणार होते. 37 कोटींचे 5 हप्ते या प्रमाणे हा निधी येणे अपेक्षित होते.

परंतु, गत मार्च 2020 पर्यंत केवळ 74 कोटी प्राप्त झाले. त्यामुळे राज्यसरकार भविष्यात निधी देतील या अपेक्षेने पुणे महापालिकेने आज 60 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. सीएनजी बस खरेदीसाठीच्या निधीतून 36 कोटी आणि एचसीएमटीआर प्रकल्पाच्या निधीतील 24 कोटी रुपयांचे वर्गीकरण करण्यात आले आहे.”

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.