Pune News : दुकानातून दूध घेऊन घरी जाणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – दुकानातून दूध घेऊन घरी जाणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोराने हिसकावले. हि घटना शनिवारी (दि. 12) सायंकाळी सातच्या सुमारास गणेशनगर रोड, वडगाव शेरी येथे घडली.

याप्रकरणी 48 वर्षीय महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या दुकानातून दूध घेऊन घरी जात होत्या. त्यावेळी मागून दुचाकी वरून आलेल्या चोराने त्यांच्या गळ्यातील 32 हजार 380 रुपये किंमतीचे मंगळसूत्र हिसकावुन घेतलं व फरार झाला.

चंदननगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.