Pune News : विद्यापीठ चौकातील पुलाच्या बांधकामामुळे जड वाहनांना बंदी

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथे मेट्रो व  दुमजली उड्डाणपुलाचे (Pune News) बांधकाम सुरु झाले असुन मेट्रोच्या व उड्डाणपुलाचे देखील काम सुरु आहे. त्यामुळे वाहतूककोंडी पाहता पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी मुंबई किंवा पिंपरी-चिंचवड शहराकडून येणाऱ्या जड वाहनांना बंदी केली असून त्यांना पर्यायी मार्ग दिले आहेत, अशी माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

 

Pune News : 16 वर्षीय तरुणीला हृदयविकाराचा झटका; मैत्रिणीसोबत बोलत असतानाच अचानक मृत्यूने गाठले

 

 

यानुसार देहुरोड, वाकड, हिंजवडी व सांगवी वाहतूक विभागाने पुढील प्रमाणे बदल केले आहेत.

1)     मुंबई कडून पुणे कडे येणारी जड अवजड वाहने मुकाई चौकातून रावेत मार्गे तसेच भुमकर चौक, वाकड नाका येथुन राजीव गांधी पुलावरुन पुण्याकडे जाणार नाही.

पर्यायी मार्ग :- मुकाई चौकातुन सरळ चांदणी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

2)  मुंबई कडून पुणे कडे येणारी जड अवजड वाहने सर्व्हिस रोडने भुमकर चौक, बाकड नाका,

राधा चौक येथे येणार नाहीत. राधा चौकातून बाणेर मार्गे पुणे विद्यापीठाकडे जाण्यास बंदी करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग : भुमकर चौक, वाकड नाका, राधा चौक ओव्हर ब्रिजने सरळ चांदणी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

3) जुन्या मुंबई पुणे हायवेने मुंबई कडून पुण्याकडे येणारी जड अवजड वाहने (Pune News) सेंट्रल चौकातुन पुढे चांदणी चौक मार्गे अथवा दापोडी हॅरीस ब्रिज मार्गे पुण्याकडे जातील.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.