Pune News : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसतर्फे हेल्पलाईन

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसतर्फे हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना राबविण्यात येत आहे.

नागरिकांना त्याबाबत सूचना दिल्या जात आहेत. नागरिक कोरोनावर उपचार घेऊन घाबरलेल्या अवस्थेत घरी जात आहेत. माझे काय होईल? मला पुन्हा कोरोना होईल का? असे विविध प्रश्नाने ग्रासलेले आहेत.

यावेळी डिप्रेशन येऊन टोकाचे पाऊल नागरिकांनी उचलू नये, यासाठी त्यांची विचारपूस करून धीर देण्यासाठी पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली व हेमंत बागूल यांच्या संयोजनाखाली ‘हॅलो, माय काँग्रेस हेल्प लाईन’ सुरू करण्यात आली आहे.

या हेल्पलाईनद्वारे कोरोनावर उपचार घेऊन घरी आलेल्या नागरिकांना फोन करून त्यांची विचारपूस करण्यात येते. त्यांना कोणता त्रास होतोय का? कोणता आहार घेताय? काही लक्षणे आहेत का? टेंशन घेऊ नका याबाबत विचारणा करून धीर देण्यात येतो.

नागरिक ‘हॅलो, माय काँग्रेस हेल्पलाईनला’ उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे. डिप्रेशनमध्ये येऊन नागरिकांनी टोकाचे पाऊल उचलू नये. या हेतूने सुरू केलेल्या या उपक्रमातून नागरिकांना केलेली विचारपूस व दिलेला सल्ला लाख मोलाचा ठरत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.