Pune News : पुण्यात होम आयसोलेशन सुरुच राहणार, संस्थात्मक आयसोलेशन बंधनकारक नाही – राजेश टोपे

एमपीसी न्यूज – पुण्यात होम आयसोलेशन सुविधा सुरुच राहणार असून, संस्थात्मक आयसोलेशन बंधनकारक नसल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे स्पष्ट केले आहे.

राज्याच्या सरासरी एवढ्या पॉझिटिव्हीटी दरापेक्षा 18 जिल्ह्यांतील पॉझिटिव्हिटी दर जास्त आहे तेथे होम आयसोलेशन (गृह अलगीकरण) बंद करून कोविड केअर सेंटरमध्ये अलगीकरणाची सुविधा निर्माण करण्याची सूचना देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. त्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली तसेच, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याला विरोध केला होता.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत स्पष्टीकरण देत पुण्यात होम आयसोलेशन सुविधा सुरुच राहणार असल्याचे सांगितले. तसेच, संस्थात्मक आयसोलेशन बंधनकारक नसल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले आहे. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना होम आयसोलेट होता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.