Pune News : ‘झेपत’ नसेल तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्या – सुप्रिया सुळे

एमपीसी न्यूज : पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर (Pune News) भाष्य करताना खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ‘झेपत नसेल तर राजीनामा द्या’ असे परखड वक्तव्य केले. सुप्रिया सुळे यांनी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नावर केलेल्या आंदोलनावेळी ही टीका केली.   

Pune : दिव्यांग-ज्येष्ठांच्या हक्कासाठी सुप्रिया सुळे यांचा आंदोलनात सहभाग

सध्या पुण्यात कोयता गॅंग आणि ग्रामीण भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत (Pune News) आहे. यासोबतच महिलांची छेडछाड, महिलांना धमकावणे असे प्रकारही घडत आहे. त्यामुळे सर्व घटना लक्षात घेता यामध्ये गृह मंत्रालयाचे अपयश असून, त्यामुळे ‘गृहमंत्री जवाब दो’ या राज्यात काय चाललंय. जर तुम्हाला झेपत नसेल तर राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.