Pune News: होम क्वारंटाईन, लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी औषध वाटप उपक्रमाचे आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन 

एमपीसी न्यूज – माँ आशापुरा चॅरिटेबल ट्रस्ट, लायन्स क्लब ऑफ पूना गणेशखिंड, लायन्स क्लब ऑफ पुणे विजयनगर यांच्या संयुक्त विद्यमाने होम क्वारंटाईन आणि लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी औषध किट वाटप उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. पुणे महानगर पालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांच्या हस्ते या औषधे किट वाटप सुरुवात झाली. 

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अभय छाजेड, माँ आशापुरा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विजय भंडारी, जीतो पुणे चॅप्टरचे अध्यक्ष ओमप्रकाश रांका, राजेश सांकला, इंदर छाजेड, मंगेश कटारिया, हेमंत रायसोनी, अशोक भंडारी, लायन्स क्लब ऑफ पूना गणेशखिंडचे अध्यक्ष लायन्स ज्योतिकुमार अगरवाल, लायन्स क्लब ऑफ पुणे विजयनगरचे अविनाश शहाणे, सामाजिक सेवा उपक्रम प्रमुख राजेंद्र गोयल, समन्वयक शाम खंडेलवाल आदी उपस्थित होते.

औषधांच्या किटमध्ये पंधरा दिवसांचे डॉक्टरांनी सुचवलेल्या गोळ्या आहेत. जवळपास औषधांच्या 5000 किटचे वाटप केले जाणार आहे. यंदाचा नवरात्र महोत्सव टाळून आशापुरा मंदिराच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.