Pune News : कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांकडून रुग्णालयाची तोडफोड

एमपीसी न्यूज – वाघोली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना बाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली.

_MPC_DIR_MPU_II

नातेवाईकांनी डॉक्टरांना देखील मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच या प्रकरणी गुन्ह्याची नोंद देखील करण्यात आली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की वाघोली येथे मोरया हॉस्पिटल आहे. या रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या एका 32 वर्षीय कोरोनाबाधित तरुणाचा मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त झालेल्या या तरुणाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड करत डॉक्टरांनाही धक्काबुक्की केली. लोणीकंद पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.