Pune News: सभागृह नेते धीरज घाटे, नगरसेवक पोटे आणि जाधव यांची कुटुंबातील सदस्यांसह कोरोनावर मात

रात्री अपरात्री कधीही कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांचे सर्वात प्रथम नगरसेवकांना फोन येत आहेत. त्यामुळे कोरोना आपल्याला होईल, हा विचार मनातही न आणता पुणे महापालिकेचे नगरसेवक जीव धोक्यात घालून रात्रंदिवस काम करीत आहेत.

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेचे सभागृह नेते धीरज घाटे, भाजपचे नगरसेवक दीपक पोटे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक भय्यासाहेब जाधव यांनी सहकुटुंब कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

नगरसेवक म्हटले की त्यांचा प्रचंड जनसंपर्क असतो. आरोग्याच्या सोयीसुविधा पासून ते रस्ते, पाणी, कचरा अशा विविध समस्या त्यांना मार्गी लावाव्या लागतात. मागील 5 ते 6 महिन्यांपासून पुण्यात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. त्यामुळे मास्क, सॅनिटायझर ते बेड्स मिळविण्यासाठी हातापाया पडण्याची वेळ आली आहे.

रात्री अपरात्री कधीही कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांचे सर्वात प्रथम नगरसेवकांना फोन येत आहेत. त्यामुळे कोरोना आपल्याला होईल, हा विचार मनातही न आणता पुणे महापालिकेचे नगरसेवक जीव धोक्यात घालून रात्रंदिवस काम करीत आहेत. असे काम सुरू असतानाच सभागृह नेते धीरज घाटे यांच्यासह कुटुंबातील 11 सदस्यांना नगरसेवक दीपक पोटे यांच्यासह घरातील 10 सदस्यांना, राष्ट्रवादीचे नगरसेवक भय्यासाहेब जाधव यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती.

या सर्वांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळीच उपचार घेऊन कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. नगरसेवक दीपक पोटे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 10 सदस्यांना गेल्या महिनाभरात कोरोनाची लागण झाली. 3 वर्षांच्या युवराज व 4 वर्षांच्या स्वराज या दोघांपासून ते उषा पोटे (वय 58) अशा सर्व सदस्यांना या आजराची लागण झाली होती.

यामध्ये केवळ दीपक पोटे यांनाच हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल करावे लागले. बाकीच्या 9 सदस्यांवर डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच उपचार करण्यात आले. हे 10 जण सुद्धा आता कोरोनामुक्त झाले आहेत. तर, यापूर्वी महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही आपल्या कुटुंबासह कोरोनावर मात केली आहे. विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, माजी नगरसेवक बाबा धुमाळ, त्यांचा मुलगा मनीष धुमाळ यांनीही कोरोनाला हरवून लावले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.