Pune News: बायकोच्या त्रासाला कंटाळलेल्या नवऱ्याची सुसाईड नोट लिहून आत्महत्या

एमपीसी न्यूज: बायकोकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका 32 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आठ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. महावीर उत्तम जगदाळे (वय 32) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना सापडली असून त्यामध्ये त्याने पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे.

लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी त्याच्या पत्नीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचे वडील उत्तम श्रीराम जगदाळे (वय 58) यांनी या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, त्या दोघांचे लग्न आठ वर्षांपूर्वी झाले होते. त्यांना दोन मुलेही आहेत. लॉकडाउनच्या काळात महावीरचे काम गेले होते. त्यामुळे तो मिळेल ते काम करत होता. तर पत्नी एका खाजगी कार्यालयात काम करत होती. दरम्यान पत्नीच्या अति मोबाईल वापरावरून त्या दोघांमध्ये सतत भांडण होत होते. सतत होणाऱ्या भांडणाला कंटाळून आणि पत्नी व्यवस्थित मानपान करत नसल्याच्या कारणावरून महावीर याबे गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली असून त्यामध्ये त्यामध्ये त्याने आत्महत्या करण्यास पत्नीच कारणीभूत असल्याचे लिहिले असल्याचे पोलिसांनी सांगितले. लोणी काळभोर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.