Pune News : चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून

ही घटना पुण्यातील खडकवाडी येथे मंगळवारी (दि.9) दुपारी दोन ते तीनच्या सुमारास उघडकीस आली.

एमपीसी न्यूज : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शारीरिक तसेच मानसिक त्रास देऊन पतीने तिचा खून केला. ही घटना पुण्यातील खडकवाडी येथे मंगळवारी (दि.9) दुपारी दोन ते तीनच्या सुमारास उघडकीस आली.

पुजा तुषार ढमढेरे ( वय. 30, रा.खडकवाडी, ता. हवेली, पुणे ) असे खून झालेल्या विवाहित महिलेचं आहे. याप्रकरणी महिलेच्या भावाने संतोष पायगुडे (वय. 43, पायगुडेवाडी, ता. हवेली, पुणे ) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजा व तुषार उर्फ बबलू ढमढेरे यांचे नोव्हेंबर 2011 रोजी लग्न झाले. पती तुषार पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा व तिला फोन वापरू देत नसायचा. पत्नीला शिवीगाळ करत शारीरिक व मानसिक त्रासही देत होता.

चाकुने तिला जीवे मारण्यास अंगावर धावून जायचा. मंगळवारी (दि.9) तुषारने पत्नीच्या डोक्यात जड वस्तू मारून तिचा खून केला. पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.