Pune News : चंद्रकांत पाटील यांच्या विषयी मी शक्यतो बोलत नाही : जयंत पाटील

एमपीसी न्यूज : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मिश्किलपणे एका कार्यक्रमात ‘मी पुन्हा कोल्हापुरात जाईन, माझ्या विरोधकांना सांगतो,’असे म्हटले होते. त्यावर तुमची प्रतिक्रिया काय, या प्रश्नावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ‘मी शक्यतो चंद्रकांत पाटलांविषयी बोलत नाही’, असे म्हणत त्यांना किरकोळीत काढले.

बालगंधर्व रंगमंदीरात डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्या ‘अटल गौरव पुरस्कार’ वितरण सोहळ्यात मनोगतपर भाषणाची सुरवात करताना चंद्रकांत पाटील यांनी, मी पुन्हा कोल्हापुरात जाईन, माझ्या विरोधकांना सांगतो,’असे विनोदनिर्मिती करण्याच्या उद्देशाने म्हटले. परंतु त्यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वक्तव्यावर ‘पण तुम्हाला पुणेकरांनी बोलवलं कधी होतं’ असे म्हणत सणसणीत टोला लगावला होता. त्यानंतर सोशल मीडियावर जोरदार ट्रोल झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत, ‘मिशन पूर्ण करून निवृत्तीनंतर कोल्हापूरला जाणार’ असे सांगत सारवासारव केली.

त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागून होते. परंतु यावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ‘मी शक्यतो चंद्रकांत पाटलांविषयी बोलत नाही’, असे म्हणत त्यांना किरकोळीत काढले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.