Pune News : खडसे यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल मला काही माहिती नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

एमपीसी न्यूज : भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. खडसे घटस्थापनेच्या मुहूर्तावर राष्ट्रवादीत प्रवेश करणार असून त्यांना अगोदर विधान परिषदेची उमेदवारी देऊन नंतर मंत्रीमंडळातील महत्त्वाचे खाते देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकनाथ खडसे यांच्या प्रवेश बद्दल मला काही माहित नसल्याचे सांगत विषयावर जास्त बोलणे टाळले. पुण्यात विधानभवन या ठिकाणी विविध प्रश्‍नांच्या संदर्भातील आढावा बैठकांच्या निमित्ताने अजित पवार आले होते. त्या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, “राजकीय जीवनात अनेकांच्या भेटीगाठी होत असतात. त्यानुसार काही जण मला भेटून गेले. त्यामुळे भेट झाली म्हणजे काही काळेबेरे समजू नये. तसेच एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबद्दल मला काही माहिती नाही. जेवढी माझ्याकडे माहिती होती ती मी तुम्हाला सांगितली,”अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.