​​​​ Pune News: बर्फ, शीतपेय, ज्यूस, सरबत, ऊसाचा रस यांची होणार तपासणी

एमपीसी न्यूज: उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर खाद्य बर्फ, शीतपेये, ज्यूस, सरबत, ऊसाचा रस या सगळ्या पेयांची अन्न आणि औषध प्रशासनाकडून (एफडीए) कडून तपासणी होणार आहे. यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार असून, ती 15 जूनपर्यंत चालणार आहे.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिक शीतपेये, सरबत, लस्सी, बर्फ गोळा, नीरा, ताक, ज्यूस, आईस्क्रिम, कोल्ड्रींक्‍स आदीचे मोठ्याप्रमाणात सेवन करताना दिसून येतात. या काळात या सगळ्यांमध्ये बर्फचा मोठ्याप्रमाणात वापर होतो. या ठिकाणचा बर्फ आणि कच्चा माल तसेच तयार अन्नपदार्थाचा दर्जा याची खातरजमा करणे आवश्‍यक असते. त्यासाठी आता विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यामध्ये या पदार्थांच्या तपासण्या करून त्याचे नमुने प्रयोगशाळेत विश्‍लेषणासाठी पाठवण्यात येणार आहेत. त्यात काही गैर आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

एमपीसी न्यूज पॉडकास्ट 12 मार्च 2022 – ऐकूयात पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरासह राज्यातील ठळक घडामोडींचा धावता आढावा. Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा

बर्फाचे उत्पादन करताना खाद्य दर्जाच्या बर्फ हा पिण्यायोग्य पाण्यापासून तयार करावा आणि तो रंगहीन असावा तसेच अखाद्य बर्फात खाद्योपयोगासाठी वापरण्यात येणारा रंग इंडिगो कारमाइन किंवा ब्रिलियंट ब्लू एफसीएफ रंग अत्यल्प प्रमाणात निळसर रंगाची छटा निर्माण होईल एवढा खाद्यरंग टाकावा. तसेच खाद्यबर्फ विक्री आणि खाद्यपदार्थात वापरण्यात येणारा बर्फ, बर्फ उत्पादक, साठा, वितरण, वाहतूक आणि विक्री यावरील उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध कायदेशीर कारवाई होईल. नियमांचे पालन करणाऱ्यांना आणि नियमानुसार बर्फाचे उत्पादन करणाऱ्यांना खाद्यबर्फ योग्य समजून त्याला कार्यकक्षेत परवानगी दिली जाणार आहे.

खाद्यबर्फ परवानाधारकांकडूनच खरेदी करावा – एफडीएचे आवाहन
खाद्यबर्फ हा परवानाधारक किंवा नोंदणीधारक व्यावसायिकाकडूनच खरेदी करावा असे आवाहन “एफडीए’ चे सह आयुक्त शिवाजी देसाई यांनी केले आहे. नागरिकांनी या पदार्थांचे सेवन करताना विक्रेत्यांकडे खाद्यबर्फच असल्याची खात्री करावी, असेही या आवाहनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.