Pune news: भानगिरे रुग्णालयात आयसीयू सेवा उभरण्यास मान्यता

एमपीसी  न्यूज: पुणे महापालिकेच्या दशरथ बळीबा भानगिरे दवाखान्यामध्ये अतीदक्षता विभाग, अस्थिरोग विभाग, कर्करोग विभाग या सेवा ट्रस्ट हेल्थकेअर फाउंडेशनच्या संयुक्तपणे देण्यास महापालिकेच्या स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहीती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, या सुविधा उपलब्ध करून देण्यास आवश्यक असणारी जागा याठिकाणी आहे. वरील सुविधांचे खाजगी रुग्णालयातील दर सर्वसामान्य रुग्णांना परवडत नाहीत. या सेवा पुरविण्यासाठी आवश्यक असणारे तज्ज्ञ, कुशल, अकुशल मनुष्यबळ महापालिकेकडे उपलब्ध नाही. त्यामुळे शासकीय दराने किंवा त्यापेक्षा कमी दराने वैद्यकीय संस्था, धर्मादायी संस्था यांच्याकडून ही सेवा आउटसोर्सिंग करावी यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यापैकी ट्रस्ट हेल्थकेअर फाउंडेशनच्या निविदेला मान्यता देण्यात आली. या सेवेचा फायदा महमंदवाडी, कौसरबाग परिसरातील गरीब रुग्णांना होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.