Pune News : बाळासाहेब ठाकरे असते तर तासाभरात मंत्रीपदावरून हाकलले असते : विनायक मेेटे

एमपीसी न्यूज : आज बाळासाहेब ठाकरे असते तर या मंत्र्याला तासाभरात मंत्रीपदावरून हाकलले असते, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केली.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात बोलताना मेटे म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राठोड हे संपर्कात असल्याचे सांगत होते. जर ते निष्कलंक होते तर 15 दिवस लपून का बसले होते. मीडियाला म्हणाले माझ्या विरोधात घाणेरडे राजकारण सुरू आहे. माझ्या कुटुंबियांसोबत समाजाची बदनामी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुळात गुन्हेगाराला जात धर्म नसतो. जर ते निष्कलंक आहात तर लपून का बसलात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

_MPC_DIR_MPU_II

ज्या क्लिप बाहेर आल्या त्याची पोलीस चौकशी का करत नाहीत. उलट काल त्यांची सरबराई करत असल्याचे दिसत होते. सरकार वाचविण्यासाठी मुख्यमंत्री चौकशी करत असल्याचे भासवत आहेत. राज्य सरकारने स्वत:हून सीबीआयकडे तपास सोपवावा. जनतेचा राज्य तपास यंत्रणेवर विश्वास राहीलेला नाही.

राठोड यांनी राजीनामा द्यावा, तपासाअंती निर्दोष आढळले तर पुन्हा मंत्रीपदावर या तुम्हाला कोणी आडवलयं. बाळासाहेब ठाकरे असते तर तासाभरात हाकालपट्टी केली असती. पण मुख्यमंत्री मंत्र्यांना संरक्षण देत आहेत. मुंडे यांच्या प्रकरणात ते लपून बसले नाहीत, देवस्थानाचा आधार घेतला नाही. उलट खुलासा केला त्यात कोणीही मयत झाले नाही. पुजा चव्हाण यांच्या कुटुंबियांवर दबाव असल्यामुळे फिर्याद देत नाहीत. आम्ही स्वत:हून कुटुंबियांना भेटत नाही कारण पुन्हा आम्ही त्यांना फूस लावत असल्याचा आरोप करतील. त्यामुळे हा तपास सीबीआय यंत्रणेकडून करावा सत्य बाहेर काढावे, अशी आमची मागणी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.