Pune News : बेकायदा रस्ते खोदाई ! महापालिकेने वीज मंडळाला ठोठावला 6 लाख 78 हजार रुपये दंड

एमपीसी न्यूज – महापालिक प्रशासनाची कुठलीही परवनगी न घेता पाषाण येथील चार वेगवेगळ्या रस्त्यांची खोदाई केल्याप्रकरणी महापालिकेने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला 6 लाख 78 हजार 865 रुपये दंड ठोकला आहे.

यासंदर्भातील नोटीस आज महावितरणला पाठविण्यात आली आहे. महावितरणने प्रभाग क्र.9 पाषाण मधील लक्ष्मण तांडा, रानमळा हॉटेल शेजारी, सोमेश्‍वर मंदिरालगत तसेच सुतारवाडी लिंक रस्त्यावर मोर चौकामध्ये केबल दुरूस्तीसाठी जवळपास 31 मीटर रस्त्याची खोदाई केली आहे. ही खोदाई करताना महापालिकेची कुठलीही परवानगी घेतली नाही.

विशेष म्हणजे, केबल दुरूस्तीनंतरही महापालिकेला कळविले नाही. या खोदलेल्या ठिकाणी पादचारी तसेच वाहन चालकांकडून तक्रारी आल्यानंतर महापालिकेच्या पथविभागाने या परिसरात पाहणी केली. कुठल्याही परवानगीशिवाय वीज मंडळाने खोदाई केल्याचे निदर्शनास आल्याने पालिकेने खोदाई दराच्या तीनपट दंड आकारणीची नोटीस वीज मंडळाच्या सूस रस्ता कार्यालयाला पाठविली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.