Pune News: फिरत्या हौदात 674 गणपती मूर्तींचे विसर्जन 

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे गंभीर संकट निर्माण झाल्याने घरच्या घरी गणपतीचे विसर्जन करण्याचे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले होते. त्याला पुणेकरांनीही चांगला प्रतिसाद दिला. तर, पुणे महापालिकेने गणेश विसर्जनासाठी तयार केलेल्या फिरत्या हौद रथांमध्ये शहरात दीड दिवसाच्या तब्बल 674 गणपतींचे विसर्जन करण्यात आले. विविध ठिकाणी उभारलेल्या मुर्तीदान केंद्रांवर 171 श्रींच्या मुर्ती महापालिकेकडून स्विकारण्यात आल्या.

काही पुणेकरांनी घरच्या घरीच बादलीत गणेश मुर्तीचे विसर्जन केले. ज्या नागरिकांना घरच्या गणपतीचे घरी विसर्जन करणे शक्य नाही, त्यांनी  फिरत्या हौदात गणरायाचे विसर्जन केले. यंदा कोरोनाच्या संकटामुळे पुणे शहरात सर्वत्र शांतता आहे.

पुणे महापालिकने एका क्षेत्रिय कार्यालयात दोन या प्रमाणे 30 पर्यावरण पूरक गणेश विसर्जन फिरत्या हौद उपक्रमाचा रविवारी सकाळी श्रीफळ वाढवून शुभारंभ केला. फिरते हौद प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत पाठविण्यात आले. फिरत्या हौदाचा मार्ग, वेळेचे नियोजन करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. शासन आणि महापालिकेच्या आवाहनाला पुणेकरांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.