Pune News : ऑनलाईन शॉपिंग, पेमेंट करताना फसवणूक झाल्यास ‘या’ नंबरवर पोलिसांना व्हॉट्सअप करा – पुणे पोलीस

एमपीसी न्यूज – सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करून पैसे काढून घेतले जातात. नागरिकांना तात्काळ तक्रार कुठे करायची याची पूर्ण माहिती नसल्याने सायबर पोलिसांपर्यंत पोहचण्यास विलंब होतो आणि फसवणूक करणारा इसम पैसे काढून घेतो. यासाठी पुणे पोलिसांनी आता व्हॉट्सअप नंबर जारी केला असून, यावर तात्काळ माहिती देता येणार आहे.

सायबर विभागाने जारी केलेल्या नंबरवर झालेल्या फसवणूकीचा प्रकार सांगता येणार आहे. त्यानंतर फसवणूकीच्या व्यवहाराची माहिती पोलिसांना पुरवावी. त्यानंतर ते व्यवहार थांबविण्यासाठी झालेल्या फसवणूकीच्या व्यवहाराचे स्क्रीनशॉट्स, डेबिटबाबत प्राप्त झालेले मॅसेजेस, बँकेचे नाव, खाते क्रमांक, डेबिटकार्ड/क्रेडीटकार्ड क्रमांक व लिंक मोबाईल नंबर इत्यादी माहिती सायबर पोलिसांचे या क्रमांकाचे व्हॉट्सअपवर पुरविल्यास सायबर पोलीस फसवणूकीत त्यांचे खात्यातून वळती झालेली रक्कम देशभरातील संबंधीत बँक/वॉलेट मध्ये गोठवून ठेवण्यासाठी कळवितात. त्यामुळे नागरिकांचे झालेल्या फसवणूकीतील व्यवहारातील पैसे परत मिळवता येतात.

नागरिकांचे सोईसाठी वरील दोन संपर्क क्रमांक पूर्ण वेळ चालू राहणार असून फसवणूक झालेनंतर तात्काळ संपर्क साधल्यास फसवणूकीची रक्कम परत मिळविण्याची शक्यता जास्त असून विलंब केल्यास फसविणारे त्यांचे खात्यातून ती रक्कम काढून घेतात त्यामुळे त्या रक्कमा पुन्हा मिळविण्यास अवघड होते. प्रथम पोलीसांना ही माहिती या क्रमांकावर दिल्यास फसवणूकीचे व्यवहार थांबविता येतात व यथावकाश त्यासंबंधी पोलिसात तक्रार दाखल करता येईल.

सायबर पोलिसांमार्फत जारी केलेले व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांक 7058719371 / 7058719375

नागरिकांना पुणे पोलिसांकडून आवाहन ‘नागरिकांनी कोणाच्याही सांगण्यावरुन मोबाईल क्लोन ॲप डाऊनलोड करु नये. कोणत्याही अनाधिकृत लिंक ओपन किंवा शेअर करु नये. मोबाईलवर आलेला ओटीपी, क्रेडीट डेबीट कार्डची माहिती शेअर करु नये. तसेच ऑनलाईन फसवणूक झाल्यानंतर तात्काळ वरील क्रमांकावर संपर्क साधावा, संबंधीत बँकेचे अधिकृत हेल्पलाईन खात्रीशीर माहित असल्याशिवाय माहिती देवू नये.

गुगल सारख्या सर्च इंजिन वरील कस्टमर केअरचा क्रमांकावर माहिती देवू नये, तो क्रमांक चोरट्याने रजिस्टर केलेला असू शकतो, असे आवाहन पुणे पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.