Pune News : पुण्यात मोबाईल डेंटल हेल्थ क्लिनिकचे उद्धाटन

एमपीसी न्यूज – गेल्या दोन वर्षांपासुन सुरू असलेल्या साथीच्या रोगामुळे, प्रत्येकाला आपल्या आरोग्याचे महत्त्व आणि निरोगी राहणे हे केवळ उदरनिर्वाहासाठीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी महत्त्वाचे आहे हे समजले. आज, हेल्थ चक्राने पुण्यातील पहिल्या मोबाईल डेंटल हेल्थक्लिनिकची सेवा सुरू केली आहे, ज्यांना आरोग्य सेवा आवश्यक आहे त्यांच्या दारात आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा त्यांचा उद्येश्य आहे.

 

महापालिकेचे आयुक्त अतिरिक्त रवींद्र बिनवडे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ, इतर मान्यवर आणि डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये झाला. कोरेगाव पार्क येथील हेल्थ चक्राच्या मुख्य कार्यालयात हा सोहळा पार पडला.

या उपक्रमाचे नेतृत्व डॉ. रुचिरा खन्ना आणि डॉ. अंकित खन्ना यांनी केले आहे, त्या गेल्या १६ वर्षांपासून शहरात काम करत आहेत, आणि त्या मलय घाटक आणि अरुण शर्मा यांच्यासह या हेल्थ चक्राच्या संस्थापक आहेत.

 

मोबाईल डेंटल हेल्थ क्लिनिक पुण्यातील मोहम्मदवाडी परिसरातून सेवा देण्यास सुरुवात करेल ज्यामध्ये सुमारे 50 हजार आणि त्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या सुमारे तीस सोसायट्या आहेत. बहुसंख्य लोकसंख्या ज्येष्ठ नागरिकांची आहे ज्यांच्यासाठी दवाखाने आणि रुग्णालयापर्यंत जाणे ही एक समस्या आहे आणि ते त्यांच्यासाठी ही सुविधा फारच उपयुक्त ठरेल.

 

सध्या हेल्थ चक्राची पुण्यात कोरेगाव पार्क, वानवडी, कोंढवा आणि महंमदवाडी येथे ४ केंद्रे आहेत आणि ते अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांच्या मदतीने रुग्णांना अत्याधुनिक दंत सेवा पुरवत आहेत यामध्ये डेंटल स्कॅनर, डिजिटल एक्स-रे,लेसर शस्त्रक्रिया, लेसर एन्डोडोन्टिक्स, आलायनर्स यांचा समावेश आहे.

 

हेल्थ चक्राच्या  सह-संस्थापक डॉ. रुचिरा खन्ना  म्हणाल्या, “हेल्थ चक्रा मोबाईल हेल्थ क्लिनिक व्हॅन खूप चांगली ऑफर देत आहे . घरून काम करणारे आयटी व्यावसायिक, वर्क फॉर्म होमवाले, लहान मुले असणार्या माता आणि लहान मुलांसाठी हे खूप उपयुक्त ठरेल. व्यस्त कॉर्पोरेट व्यक्ती व ज्यांना प्रवास करण्यासाठी वेळ नाही अश्या सर्वांना या सेवेमुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे सोपे होईल”

 

हेल्थ चक्रा सह-संस्थापक डॉ. अंकित खन्ना म्हणाले की, “आमच्या रुग्णांना सर्वसमावेशक पद्धतीने उपचार देणे हा आमचा उद्देश आहे. आम्‍ही डॉक्‍टर असल्‍याने समजून घेतो की शरीराचा प्रत्‍येक भाग दुसर्‍याशी निगडीत असतो आणि एकमेकांशी जोडलेला असतो, समस्‍या शांतपणे सोडवल्‍याने अधिक चांगल्या प्रकारे लाभ मिळतो आणि रुग्णाला आराम आणि उपचार मिळू शकतात.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.