Pune News: लॉकडाऊन नव्हे कन्टेनमेंट झोनच्या संख्येत वाढ, ‘हे’ आहेत शहरातील 74 कन्टेनमेंट झोन

महापालिकेच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढून सोशल मीडियावर लॉकडाऊनचा फेक मेसेज व्हायरल

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका क्षेत्रात मध्यरात्रीपासून पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्याचा फेक मेसेज सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यामुळे शहरात खळबळ उडाली होती, मात्र तो पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शहरातील सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांबाबत काढलेला सुधारीत आदेश असून कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन शहरात सुरू झालेला नसल्याचे महापालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.  

कोरोनाचे रुग्ण उपनगरात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तर सहा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये शहरातील सर्वाधिक रुग्ण आहेत. या भागाचा प्रतिबंधित क्षेत्रामध्ये समावेश करण्यात आला आहे. महापालिकेतर्फे आणखी आठ नवीन प्रतिबंधित क्षेत्रे वाढविण्यात आली आहेत. आता एकूण 74 प्रतिबंधित क्षेत्र असतील, असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी गुरुवारी दिले आहेत.

धनकवडी-सहकारनगर, नगररस्ता-वडगाव शेरी, कोथरुड-बावधन, हडपसर-मुंढवा, वारजे-कर्वेनगर, कोंढवा-येवलेवाडी या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

पुणे महापालिकेने 17 ऑगस्ट रोजी घोषित करण्यात आलेल्या 66  प्रतिबंधित क्षेत्रांमधून एक क्षेत्र कमी करण्यात आले आहे. 1 ऑगस्ट रोजी असलेल्या 75  प्रतिबंधित क्षेत्रामधून 12 क्षेत्र कमी करण्यात आले होते. पुणे महापालिकेकडून प्रतिबंधित क्षेत्रांचा आढावा घेऊन त्याची पुनर्रचना केली जात आहे.

15  क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या 66  प्रतिबंधित क्षेत्रांचा आढावा घेतल्यानंतर ज्या भागातील रुग्ण कमी झाले आहेत त्या भागातील प्रतिबंध हटविण्यात आले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

तर, काही भाग नव्याने समाविष्ठ करण्यात आले आहेत. कसबा-विश्रामबाग – 4, भवानी पेठ – 2, ढोले पाटील – 2, धनकवडी-सहकारनगर – 8, बिबवेवाडी – 5, येरवडा-कळस-धानोरी – 2, वानवडी-रामटेकडी – 2, शिवाजीनगर-घोले रस्ता – 3, नगररोड-वडगाव शेरी – 7, सिंहगड रोड – 2, हडपसर-मुंढवा – 11, कोंढवा-येवलेवाडी – 3, वारजे-कर्वेनगर – 4, कोथरूड-बावधन – 9, औंध-बाणेर -9 या  क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नवे प्रतिबंधित क्षेत्र कमी झालेले आहेत.

 

महापालिका आयुक्तांचा संबंधित आदेश व शहरातील मायक्रो कन्टेनमेंट झोनची सुधारीत यादी पुढीलप्रमाणे…

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.