Pune News : कात्रज दुधाच्या दरात वाढ

एमपीसी न्यूज- कात्रज दूधाच्या खरेदी आणि विक्री दरात दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (Pune News )घेतला आहे.

संघाच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. या दरवाढी विषयी कात्रज डेअरीच्या अध्यक्षा केशरताई पवार म्हणाल्या की,इंधनाच्या दरात झालेली दरवाढ, पशुखाद्याचे वाढलेले दर, जनावरांमधील लम्पी आजाराचा त्रास यामुळे दूध उत्पादक शेतकरी अत्यंत अडचणीत आला आहे. या परिस्थितीत केवळ दूध उत्पादक शेतकऱ्यास मदत करण्याच्या हेतूने ही दरवाढ करण्यात आली आहे.

Kasarwadi news : शॉर्टसर्कीटमुळे जय गणेश टायर ला भीषण आग

1 फेब्रुवारीपासून गायीच्या दूधाच्या खरेदी दरात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ करण्यात आली येणार आहे. 1 फेब्रुवारीपासून गायीच्या दूधाचा 3.5 फॅट व 8.5 एसएनएफसाठी खरेदी दर संस्थांसाठी वरकड खर्चासहित प्रतिलिटर 37 रुपये 80 पैसे राहील. दूध खरेदी दरात वाढ करण्यात आल्याने दूधाच्या विक्री दरात देखील वाढ करण्यात आली आहे.तर म्हशीच्या दूध खरेदीबाबत वाढ न करता विक्रीदरात दोन रूपयांनी वाढ करण्यात (Pune News ) आली आहे. त्यामुळे आता कात्रज डेअरीच्या दुधाचे दर हे टोण्ड, डबल टोण्ड, प्रमाणित व मलई दूधाचे दरात प्रतिलिटर दोन रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.