Pune News: स्वातंत्र्य दिनी कोरोना योद्ध्यांचा सन्मान

Pune News: Independence Day Corona Warriors honored कोरोना विषाणू साथीच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता योगदान देणाऱ्या कोरोना योध्यांचा, सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान स्वातंत्र्य दिनी भाजपचे स्वीकृत सदस्य सचिन दांगट यांच्या वतीने करण्यात आला.

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणू साथीच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता योगदान देणाऱ्या कोरोना योध्यांचा, सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान स्वातंत्र्य दिनी भाजपचे स्वीकृत सदस्य सचिन दांगट यांच्या वतीने करण्यात आला.

या कार्यक्रमात पैंगबर शेख, आलम पठाण (सोशल मीडिया फाऊंडेशन) ऋतृराज दीक्षित, सचिन सावंत (आरोग्य निरीक्षक, पुणे मनपा), पराग ढेणे (सामाजिक कार्यकर्ता), अक्षय बराटे (ऋणानुबंध संस्था), डॉ. राजेंद्र खेडेकर (श्रीज्ञानयोग सेवा ट्रस्ट), तुफैल शेख, सरफराज सय्यद (हेल्पिंग हॅन्डस् फाऊंडेशन), जावेद शेख, रफीक शेख, ऊम्मेद जांगिड आदींचा कोरोना योध्दा म्हणून सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक, शाल, फुल देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी सचिन मोरे (अध्यक्ष, खडकवासला भाजप), किरण बारटक्के (चिटणीस, पुणे भाजप), अरविंद जोशी, रेणुका मोरे, वर्षा पवार, परशुराम पुजारी, अमजद अन्सारी, किरण साबळे, आनंद देशपांडे यांच्यासह संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे संयोजन पुणे पालिकेचे स्वीकृत सभासद सचिन दांगट यांनी केले होते. माळवाडी वतीने कोरोना कोविड 19 या महाभयानक विषाणू साथीमध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून गरजवंत लोकांना जेवण, कोरडा शिधा, अर्सेनिक अल्बम गोळ्या, मास्क, औषधे फवारणी आदी कामामध्ये सहभाग घेऊन समाजाप्रती आपल्या कर्तव्यात कुठेही कमी पडले नाहीत अशा सर्वांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान केला गेला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.