_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pune News : भारतीय मजदूर संघाच्या वतीने हाॅस्पीटल मधील कोरोना योद्धांचा सन्मान

0

एमपीसी न्यूज – हाॅस्पीटल मधील डाॅक्टर, नर्सेस, वाॅर्ड बाॅय, सुरक्षा रक्षक, आया व इतर संबंधित सेवकांचा भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा यांच्यावतीने सन्मान करण्यात आला. लक्ष्मी रोड येथील सुतिका सेवा मंदिर हाॅस्पीटल मध्ये नुकताच हा कार्यक्रम पडला. यावेळी कोरोना योद्धांना सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी कमला नेहरु हाॅस्पीटलच्या अक्षिक्षक डाॅ. लता त्रिंबके, भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा चिटणीस जालिंदर कांबळे, जन कल्याण समितीचे सेवा प्रमुख बाळासाहेब पाटोळे, भारतीय मजदूर संघाचे जिल्हा संघटक विवेक ठकार, राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी संघाचे सरचिटणीस दिपक कुलकर्णी, अजेंद्र जोशी, अखिल भारतीय बिडी मजदूर महासंघाचे सरचिटणीस उमेश विस्वाद, जिल्हा सेक्रेटरी बाळासाहेब भुजबळ, सचिन मेंगाळे, महानगरपालिका संघटनेचे चिटणीस संजय कांबळे, भाग्यश्री बोरकर आदी उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी लवकरच असे कार्यक्रम केले जाणार असल्याची माहिती सचिन मेंगाळे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment