Pune News : भारतातील सर्वात मोठे पशु उपचार केंद्र पुण्यात होणार

एमपीसी न्यूज – जखमी प्राण्यांना वेळेवर उपचार देण्यासाठी वन विभागाच्या वतीने बावधन येथे संक्रमण उपचार केंद्र (TTC) उभारले जाणार आहे. 22 एकर परिसरात उभारल्या जाणाऱ्या या केंद्रात अर्धांगवायू गेलेल्या प्राण्यांना निवारा दिला जाईल.

कात्रज येथील राजीव गांधी सर्प उद्यानात तीन एकर परिसरात सध्या जखमी प्राण्यांना ठेवले जाते. प्राण्याची संख्या वाढली असल्याने उद्यानात प्राण्यांना ठेवण्यासाठी जागा नसल्याने बावधन येथे 22 एकर परिसरात संक्रमण उपचार केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या दोन वर्षात हे केंद्र सुरू होण्याची शक्यता आहे.

पुण्यात भारतातील सर्वात मोठे प्राणी उपचार केंद्र उभारले जात आहे. अलिकडे मानव आणि प्राणी यांच्यातील संघर्ष वाढला आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या क्रेंद्राची आवश्यकता आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी एका इंग्रजी न्यूजपोर्टलसोबत संवाद साधताना दिली.

संक्रमण उपचार केंद्र (TTC)
– 22 एकर परिसरात उभारले जाणार केंद्र
– विविध प्राण्यांसाठी एकूण 16 युनिट्स
– पशुवैद्यकीय रुग्णालय आणि प्रशासकीय इमारत
– शवविच्छेदन निवारा आणि जनावरांसाठी दहन व्यवस्था

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.