Pune News: इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारताची उल्लेखनीय प्रगती – डॉ. नीलम गोऱ्हे

एमपीसी न्यूज – भारतरत्न दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारताने खूप प्रगती केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची राजनैतिक प्रतिमा उंचावली, असे मत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

राजीव गांधी स्मारक समितीतर्फे भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्याच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमात गोऱ्हे बोलत होत्या. इतिहास अभ्यासक व प्रसिद्ध वकील राज कुलकर्णी, वरिष्ठ पत्रकार व राज्यसभेचे खासदार कुमार केतकर, ज्येष्ठ विचारवंत डॉ. भालचंद्र मुणगेकर, संयोजक व राजीव गांधी स्मारक समिती पुणे अध्यक्ष गोपाळ तिवारी हे ऑनलाईन हजर होते.

_MPC_DIR_MPU_II

अध्यक्षीय भाषण करताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, भारतरत्न इंदिरा गांधी यांचा काळ हा जागतिक स्तरावर व देशाअंतर्गत खूप आव्हानात्मक होता. या कालावधीत राजकीय व आर्थिक विविध मतप्रवाह होते. त्यामुळे राजकीय समीकरणे सुद्धा वेगवेगळी होत होती. त्यांचा कार्यकाळ हा धाडसी, प्रेरणादायी आणि लोकांच्यावर प्रचंड प्रभाव असणार होता. बाळासाहेब ठाकरे यांनी 31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिराजींच्या हत्येनंतर काढलेले चित्र खूप बोलके होते.

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी या काँग्रेसच्या राष्ट्रपतींना हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेतर्फे पाठिंबा दिला होती. त्यामागे चांगली माणसे मोठी व्हावी असा हेतू होता. भारतरत्न इंदिरा गांधी यांनी संयुक्त महाराष्ट्र स्थापन करण्यासाठी 1959 झाली काँग्रेस कार्यकारणीमध्ये केलेला ठराव, तसेच बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि जमिनीच्या सुधारणा कायदे यामुळे जनतेला दिलासा मिळाला. संयुक्त महाराष्ट्रात 59 वर्षानंतर विधानपरिषदेत उपसभापती म्हणून महिलेला काम करायला मिळणे. हा महाराष्ट्रातील समाज सुधारक तसेच भारतीय समाजाचा प्रागतिक विचारांचा त विजय म्हणावा लागेल, असेही त्या म्हणाल्या.

कुमार केतकर यांनी आपल्या भाषणामध्ये इंदिरा गांधींच्या कारकिर्दीचा सविस्तर आढावा घेतला. त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नंतर इंदिरा गांधींना पंतप्रधान होण्यासाठी पक्षांतर्गत निवडणूक लढवावी लागली. पक्षांतर्गत निवडणुकीनंतरच त्या पंतप्रधान झाल्या याचा आवर्जून उल्लेख केला. इंदिरा गांधींनी केलेल्या अनेक घटनात्मक कामकाजाबाबत तसेच अनेक घेतलेल्या प्रशासकीय निर्णय बाबत त्यांनी आवर्जून उल्लेख केला. त्या कर्तव्य कठोर व तितक्याच हळव्या होत्या असे सांगितले. 1966 ते 1984 या कालावधीतील राजकीय समीकरणाची पार्श्वभूमी कुमार केतकरांनी विशद केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.