Pune News : ‘त्या’ 12 रस्ते अन् 2 पुलांची माहिती द्या अन्यथा आंदोलन ; मनसेचा इशारा

एमपीसी न्यूज : पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) तत्त्वावर 12 रस्ते अन् 2 उड्डाणपुल बांधले जाणार आहेत. त्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यास आता मनसेनेही विराेध केला आहे. प्रशासनाकडून काही खुलासे मागविले असून समाधानकारक माहिती न दिल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे महापालिका भवनात पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी मनसेचे नेते बाबु वागसकर, किशाेर शिंदे, महापालिकेतील गटनेते वसंत माेरे, साईनाथ बाबर यावेळी उपस्थित हाेते.

स्थायी समितीने पीपीपी तत्वावर 12 रस्ते आणि 2 पुल विकसित करण्याचा प्रस्ताव मंजूर केलाा आहे. अंदाजपत्रकात बाणेर, हडपसर, लाेहगाव येथील रस्ते पीपीपी तत्वावर विकसित करण्याचा तरतूद केली गेली. हे रस्ते प्रस्तावातून वगळण्यात का आले ? खराडीमधील बांधकाम व्यावसायिकांनी पुल, रस्ते विकसित करण्याची तयारी दाखविली हाेती, हा भाग महापालिका हद्दीत आल्यानंतर त्यांनी भुमिकेत बदल केला आहे. या भागातील पुल आणि रस्त्यांसाठी सहाशे काेटी रुपये इतका खर्च हाेणार आहे, हा खर्च काेठून केला जाणार ? हे स्पष्ट करावे अशी मागणी मनसेने केली आहे.

अंदाजपत्रकात मुंढवा ते बंडगार्डन असा नदीकाठचा रस्ता सुचविण्यात आला असून, प्रत्यक्षात स्थायी समितीच्या प्रस्तावात या ठिकाणी उड्डाणपुल दाखविला गेला आहे. हा बदल करताना काेणालाही का विश्वासात घेतले नाही ? यासंदर्भातील बैठकीतील मिनिट्स जाहीर करावेत, असे मुद्दे मनसेने उपस्थित केले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.