Pune News : फोरसाइट कॉलेज ऑफ कॉमर्स तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

एमपीसी न्यूज – फोरसाइट कॉलेज ऑफ कॉमर्स तर्फे (Pune News) आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.फोरसाइट कॉलेज ऑफ कॉमर्स (FCC) च्या एन . एस. एस. आणि आय . क्यू . ए . सी. सेल युनिट च्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत महिलांचा सत्कार आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला.
SET Exam News : सेट परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध
यावेळी सचिव शैलेश मेहता आणि ज्ञानोदय शिक्षण सेवाभावी संस्थेच्या संचालिका निशा मेहता, डॉ. रवी पिल्ले, कर्मचारी व विद्यार्थी वर्ग यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. उपप्राचार्या गौरी जाधव यांनी महाविद्यालयाचे शैक्षणिक यश, इंटर्नशिप आणि प्लेसमेंट यावर प्रकाश टाकणारा महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला.
उपेक्षित, स्वावलंबी, ज्या महिला आपली उपजीविका करण्यासाठी झटत आहेत अश्या व्यवसायाने गॅरेज मालक शिवकुमारी, नीरा विक्रेत्या वैशाली सुरेश भंडारी, भाजी विक्रेत्या यशोदा माळी आणि त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या कुमकुम लुंकड आणि समुपदेशक श्वेता सूर्यवंशी यांचा सत्कार आणि सन्मान कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या रिता इंडिया फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. रिता मदनलाल शेटीया यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी डॉ. रिता म्हणाल्या कि , तळागाळातील महिलांच्या कार्याला सलाम म्हणून त्यांचा सन्मान आणि सत्कार केल्याबद्दल एफ सी सी च्या या कार्याचे कौतुक करत आपल्या मार्गात कितीही अडचणी आल्या तरी त्यांना आव्हान म्हणून स्वीकारत मार्गात आलेल्या प्रत्येक दगडाचे हिऱ्यात रूपांतर करण्याची क्षमता आपल्यात असली पाहिजे. पुरस्कार विजेत्या श्वेता सूर्यवंशी यांनी महिलांना जीवनाच्या लढाईत कधीही हार मानू नये असे सांगितले.
यावेळी “स्वच्छ भारत अभियान”या पथनाट्याचे विद्यार्थ्यांचे अनुकरणीय प्रदर्शन. “निवडणूक कर्तव्याचे महत्त्व आणि मतदानाचा अधिकार” भाषण आणि विविधतेतील एकता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविणाऱ्या तक्त्यांचा प्रचार करण्यात आला. बेस्ट प्रेझेंटेशन, बेस्ट ब्रँडिंग, बेस्ट पॅकेजिंग, बेस्ट प्राइसस्ट्रॅटेजी, बेस्ट ट्रेडिंग, बेस्ट पार्टनरशिप, बेस्ट पोटेन्शियल एंटरप्रेन्योर आदी विभागांसाठी विशेष पुरस्कार विद्यार्थ्यांना दिले जातात.
सहाय्यक प्रा .अर्चना म्हस्के व सहाय्यक प्रा. शिल्पा खाडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सहाय्यक प्रा. हिना शेख आणि सहाय्यक प्रा. तेजश्री तावरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सहाय्यक प्रा. सुरजीत कुमार (Pune News) यांनी आभार मानले.