Pune News : हिंदुत्वाची व्यापक व्याख्या समजून घेणे गरजेचे – विक्रम गोखले

एमपीसीन्यूज : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान केले पाहिजे, मात्र ते करत असताना सावरकरांचे विचार आचरणात आणणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केले. हिंदुत्वाचा व्यापक अर्थ समजून घेतला पाहिजे व हिंदुत्वाची व्यापक व्याख्या देखील लोकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे, असे ही ते म्हणाले.

ब्राह्मण महासंघाच्या वतीने क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या सहकार्याने पौरोहित्य करणाऱ्या गरजू ब्रह्मवृंदास आज किराणा साहित्य प्रदान करण्यात आले. त्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे, शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

परशुराम जयंतीदिनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्यावे, या मागणीसाठी ब्राह्मण महासंघ राज्यभर ऑनलाईन मोहीम सुरु करत असल्याचे आनंद दवे म्हणाले. या ऍपचे उदघाटन विक्रम गोखले यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच अलका पेठकर व शिक्षण समिती अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर यांच्या हस्ते मैत्रीयी पतसंस्थेच्या संगणकीकरणाचे उदघाटन करण्यात आले.

ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागातील ब्राह्मण समाजातील अनेक कुटुंबांची परिस्थिती हलाखीची असून त्यांच्या उत्तथानासाठी ब्राह्मण आर्थिक विकास महामंडळाची स्थापना व्हावी, अशी आग्रही मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी मांडली. मुकुल माधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशनने ‘जिथे कमी तिथे आम्ही’, हे ब्रीद अंगीकारले असून समाजातील सर्व स्तरातील गरजूना ह्या संकटकाळात मदत करत असल्याचेही खर्डेकर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.