Pune News: ग. दि. माडगूळकर स्मारक लांबणीवर पडणे खेदजनक – आबा बागुल

एमपीसी न्यूज – कविवर्य ग. दि. माडगूळकर यांची जन्मशताब्दी उलटून गेली तरीही महापालिका त्यांचे स्मारक उभारु शकली नाही. ही बाब खेदजनक आहे, अशी प्रतिक्रिया महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी व्यक्त केली. स्मारकाचे काम आता तरी नेटाने मार्गी लावा, अशी मागणी त्यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली आहे.

ग. दि. माडगूळकर यांचे स्मारक पुण्यासाठी भूषण असेल. या स्मारकासाठी मी तळजाई येथे जागा सुचविली होती. श्रीधर माडगूळकर, ज्येष्ठ नेते उल्हास पवार आणि माजी आमदार अनंत गाडगीळ,माजी महापौर विद्यमान आमदार मुक्ताताई टिळक यांच्यासह दोन वर्षापूर्वी जागेची पहाणी केली होती. परंतु, त्यावेळी कोथरुड येथील सर्व्हे क्रमांक 69, 70 ही जागा स्मारकासाठी निश्चित करण्यात आली. एव्हाना हे स्मारक उभे करायला हवे होते.

पुणे नवरात्रौ महोत्सवात ग.दि.मा. जन्मशताब्दी साजरी करण्यात आली होती. त्या कार्यक्रमात श्रीधर माडगूळकर आणि कुटुंबीय उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत व्यासपीठावरील सर्वच वक्त्यांनी ग.दि.मा स्मारक लवकर व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती. परंतु जन्मशताब्दी वर्षात स्मारक उभे राहिले नाहीपुणे हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. ग.दि.मां चे वास्तव्यही पुण्यात होते. तरीही त्यांच्या स्मारकाचा विषय लांबणीवर पडणे खेदजनक आहे. आतातरी महापालिकेने स्मारकाचे काम केवळ कागदोपत्रीच न ठेवता, त्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करावी असे आबा बागुल यांनी महापौरांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.