Pune News : तळजाई टेकडीच्या पायथ्याला मैत्रिणीसोबत गप्पा मारत थांबणे तरुणाला पडले महागात

एमपीसी न्यूज : तळजाई टेकडीच्या पायथ्याला निर्जन ठिकाणी मैत्रिणींसोबत गप्पा मारत थांबणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. त्यांच्याजवळ आलेल्या एका अज्ञात तरुणाने कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याजवळील मोबाईल पर्स चोरून नेले. सिंहगड पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश चंद्रकांत वर्मा (वय 20) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तरुणास शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मैत्रिणीसोबत तळजाई टेकडी परिसरात निर्जन ठिकाणी गप्पा मारत थांबला होता. यावेळी त्यांच्याजवळ आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने दोघांनाही कोयत्याचा धाक दाखवत धमकावले. आणि त्यांची दुचाकी मोबाईल आणि रोख रक्कम असा साठ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला.

त्यानंतर टेकडीवरून खाली आलेल्या तरुणाने सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत घडलेला प्रकार. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करीत घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेणे सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.