Pune News : लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन यांनी स्वीकारला दक्षिण कमांड मुख्यालयाचा कार्यभार

एमपीसी न्यूज – लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन यांनी ‘जनरल ऑफिसर कमान्डींग इन चिफ’  म्हणून पुण्यातील दक्षिण कमांड मुख्यालयाचा कार्यभार सोमवारी (दि.1) स्वीकारला.

राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे हुतात्मा सैनिकांच्या स्मृतीला पुष्पचक्र अर्पण करून त्यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर दक्षिण मुख्यालयात त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला.

ले. जनरल जे. एस. नैन हे कुंजपुरा सैनिक शाळेचे व पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत.

जून 1983 मध्ये त्यांची डोगरा रेजिमेंटमध्ये नेमणूक झाली. त्यानंतर लष्करात त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.