Pune News : भारतीय विद्या भवनमध्ये ‘ जाऊ देवाचिया गावा ‘ कार्यक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज – ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक (Pune News ) प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘जाऊ देवाचिया गावा ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार ,19 मार्च 2023 रोजी सायंकाळी साडे पाच वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम होणार आहे.

 

ISL : आयएसएल फायनलमध्ये एटीके मोहन बागानचा सामना बेंगळुरू एफसीशी होणार 

संतरचनांचे व्हायोलिनवरील सादरीकरण या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. संकल्पना आणि निरुपण डॉ वंदना बोकील-कुलकर्णी यांचे असून या संतरचना व्हायोलिनवर अनुप कुलथे सादर करणार आहेत. रोशन चांदगुडे (तबला),प्रणय सकपाळ (पखवाज),चंद्रकांत चित्ते(की बोर्ड ),धनंजय साळुंके (ताल वाद्य ) हे साथसंगत करणार आहेत.कलादिग्दर्शन कपिल जगताप यांचे आहे.

‘मोगरा फुलला’ पासून ‘अवघा रंग एक झाला’ पर्यंत अनेक संतरचना व्हायोलिनवर सादर केल्या जाणार आहेत. ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. हा कार्यक्रम विनामूल्य आहे. ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या (Pune News ) सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा 154 वा कार्यक्रम आहे .

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.