Pune News : सशांना दत्तक घेण्याचे जीवसेवा फाउंडेशनकडून पुणेकरांना आवाहन

एमपीसी न्यूज : सातारा रस्त्यावरील आदिनाथ सोसायटीमध्ये पिंजऱ्यात डांबून ठेवलेल्या सशांना तब्बल दीड वर्षांनी मोकळा श्वास घेता येणार आहे. आदिनाथ सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पाळलेल्या या सशांचे आणि माशांचे हाल बघून प्राणीप्रेमी जीवसेवा फाऊंडेशनने सोसायटीच्या चेअरमन व सेक्रेटरीवर गुन्हा दाखल केला. 

त्यांनी ससे व माशांच्या सुटकेसाठी न्यायालयीन लढा दिला. पुण्यातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी यावर सुनावणी करताना सशांना दत्तक घेण्याचे व माशांना नैसर्गिक जलाशयात सोडण्याचे अंतरिम आदेश दिले आहेत. त्यानुसार जीवसेवा फाऊंडेशनकडून या सशांना दत्तक घेण्याचे आवाहन पुणेकरांना करण्यात येत आहे.

दीड वर्षांपूर्वी आदिनाथ सोसायटीच्या गार्डनमध्ये फिरताना मला एका कोपऱ्यात उघड्यावर लोखंडी जाळीच्या पिंज-यात अंदाजे 50-60 ससे दिसले. पावसाचे दिवस असल्याने ते भिजत होते आणि त्यांना खाद्यही दिले नव्हते. याच्याच शेजारी विशिष्ट प्रजातीचे मासे पाळल्याचे दिसले. त्यांनाही खाद्य आणि ऑक्सिजन दिसून आला नाही. याची चौकशी केल्यावर कळले की हे ससे व मासे सोसायटीचे चेअरमन आणि सेक्रेटरी यांच्या अधिपत्याखाली आहेत आणि ते मुलांचे, येणा-या- जाण्याऱ्यांचे मनोरंजन करण्यासाठी पाळल्याचे समजले. त्यामुळे प्राणी संरक्षण कायद्यानुसार याची देखभाल होत नसल्याने मी चेअरमन महेंद्र जैंन व सेक्रेटरी राहुल विलास मेहता यांच्याविरोधात पोलीसांत तक्रात दाखल केली व भारतीय दंड संहिता, प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू अनिमेशन ऍक्ट 1960 व वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 नुसार गुन्हा दाखल केला, असे फाऊंडेशनचे अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

न्यायालयाने याचा निकाल देताना या सशांचा ताबा जीवसेवा फाऊंडेशनकडे द्यावा, तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सशांची वैद्यकीय तपासणी करावी आणि माशांना नैसर्गिक जलस्रोतामध्ये सोडण्यात यावे, असे सांगितले आहे. सध्या जीवसेवा फाऊंडेशन ह्या सशांची देखभाल करत आहे. नियमानुसार एक व्यक्ती 2-3 ससे पाळू शकते.

या सशांची चांगली देखभाल व्हावी आणि त्यांना हक्काचे पालक मिळावेत यासाठी जास्तीत जास्त पुणेकरांनी पुढाकार घेऊन त्यांना दत्तक घ्यावे. यासाठी 9822195092 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अमित शहा यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1