Pune News : पुण्यात भारत आणि 24 आफ्रिकी देशांच्या  सैन्यदलांत मंगळवारी संयुक्त सराव

एमपीसी न्यूज – भारत आणि 24 आफ्रिकी देशांच्या  सैन्यदलामध्ये संयुक्त (Pune News) सैनिकी सरावाचे आयोजन पुण्यात करण्यात आलं आहे . दहा दिवस चालणाऱ्या या सरावाची सुरुवात  21  मार्चला पुण्यातील लष्कराच्या औंध मधील परदेशी प्रशिक्षण केंद्रामधून होणार आहे. पहिल्या दिवशी भूसुरुंग शोध मोहिमेचा सराव केला जाणार आहे. आफ्रिका खंडातील 24  देशांच्या लष्करी तुकड्या भारतीय सैन्य दलांसोबत या संयुक्त सरावात सहभागी होणार आहेत .

 

 

या सरावाचे उद्दिष्ट , संयुक्त राष्ट्रांच्या आदेशानुसार शांतता राखण्यासाठी आयोजित संयुक्त मोहिमांमध्ये सामरिक कौशल्ये, कवायती आणि कार्यपद्धती  सक्षम करणे, आफ्रिकन राष्ट्रांच्या सैन्यांशी समन्वय आणि चांगले सबंध निर्माण करणे आणि भारतीय संरक्षण उद्योगांना प्रोत्साहन देणे हे आहे.दहा दिवस चालणाऱ्या या सरावाची सुरुवात मंगळवारी (दि.21) परदेशी प्रशिक्षण नोड, औंध, पुणे येथे उद्घाटन समारंभाने होईल. या अभ्यासादरम्यान संयुक्त राष्ट्रांच्या धोरणांनुसार मानवतावादी भुसुरूंग विरोधी मोहीम आणि शांतता प्रस्थापित कारवाई याबाबत संयुक्त सराव आयोजित करण्यात आला आहे.

 

Chakan News : चाकणच्या कररचनेचे फेरसर्वेक्षण करू – मुख्यमंत्री शिंदे

 

या संयुक्त सरावाबरोबरच या आफ्रिकी देशांच्या लष्करप्रमुखांच्या भारतीय लष्कर प्रमुखांसोबतच्या परिषदेचेही यावेळी आयोजन करण्यात आलं आहे. भारतीय लष्कर प्रमुखांबरोबरच 21 आफ्रिकी  देशांचे लष्करप्रमुख या परिषदेत सहभागी होणार आहेत. या परिषदेदरम्यान संरक्षण विभागाला लागणाऱ्या सामग्रीचे प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे .

 

 

संयुक्त सराव आफ्रिका-इंडिया मिलिटरीज फॉर रीजनल युनिटी (AMRUT) च्या संकल्पनेला चालना देईल आणि  संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांवर भर देईल. हे सामूहिक प्रयत्न सर्व सहभागी राष्ट्रांमधील सैन्याची आंतरकार्यक्षमता आणि एकत्रित  क्षमता वाढविण्यासाठी (Pune News)  लक्ष केंद्रित करेल ज्यामुळे शांतता राखण्याच्या मोहिमांमध्ये  जीवित आणि मालमत्तेचा धोका कमी होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.