Pune News : आता कंगनाला महत्व देण्याची गरज नाही ; संजय राउतांचा ‘कंगना’वर पुन्हा निशाणा

एमपीसीन्यूज : आता कंगनाला महत्व देण्याची गरज नाही. ती आता गुन्हेगार आहे, संशयित आहे. तिला समन्स पाठवलं आहे. तिने मुंबई पोलिसांसमोर हजर राहावं. ती शूर मुलगी आहे असं मला वाटायचं, असे म्हणत शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा अभिनेत्री कंगना राणावतवर निशाणा साधला.

पुणे पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.

अर्णब गोस्वामी आणि रिपब्लिक टीव्हीवर टीका

अर्णब गोस्वामी आणि रिपब्लिक टीव्हीचे नाव न काढता संजय राऊत यांनी पुन्हा एकदा टीका केली. खासदार राऊत म्हणाले, मूख्यमंत्र्यांचा उल्लेख एकेरी भाषेत करणे योग्य नाही. मी त्या चॅनलचं नाव घेणार नाही, त्यांची तेवढी लायकी नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.