Pune News : ‘खयाल यज्ञ’ संगीत महोत्सवास शुक्रवारपासून प्रारंभ

‘Khayal Yadnya’ Music Festival starts from Friday

पुणेन्यूज :  ‘स्वरभास्कर’ पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगीताचार्य पंडित द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानतर्फे  ‘खयाल यज्ञ’ हा संगीत महोत्सव 12  ते 14 फेब्रुवारी  या कालावधीत पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे.

पंडित भीमसेन जोशी यांनी ख्याल गायकीला मानाचे स्थान मिळवून दिल्याने तसेच पंडितजींची कारकीर्द पुण्यात घडल्यामुळे   यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये सकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत अखंडपणे हा ‘ख्याल यज्ञ’ संगीत महोत्सवात होत आहे.

यामध्ये देशातील दिग्गज तसेच नवोदित  मिळून 39  कलाकारांचे  सादरीकरण होणार आहे. 39 गायक, 14 तबला वादक, 10 पेटीवादक,  1 सारंगी वादक, 3 निवेदक यांचा सहभाग हे या संगीत महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे .

12 फेब्रुवारी रोजी सकाळी 7  वाजता पंडित उदय भवाळकर यांच्या धृपद गायनाने या “खयाल यज्ञाची” सुरुवात होणार आहे.

त्यांनतर या धृपदीय वातावरणात सकाळी पावणे आठ वाजता    पं. भीमसेन जोशी जन्मशताब्दी समिती  अध्यक्ष  खासदार गिरीश  बापट, उपाध्यक्ष पद्मविभूषण पं. हरिप्रसाद  चौरासिया, स्वागताध्यक्ष पुनीत बालन,  विजय पुसाळकर, पद्मश्री पं. उल्हास कशाळकर, तालयोगी पद्मश्री पं. सुरेश तळवलकर, पं. विजय घाटे, डॉ. विकास कशाळकर, पं. अतुलकुमार उपाध्ये यांच्या हस्ते प्रतिमा पूजन होईल.

13  फेब्रुवारी रोजी अश्विनी भिडे -देशपांडे, पं. डॉ. राम देशपांडे, पं. जयतीर्थ मेवुंडी,सावनी शेंडे-साठे,संदीप रानडे, सौरभ नाईक,ओंकार दादरकर, पं. रितेश आणि पं. रजनीश मिश्रा,पद्मा तळवलकर आदी गायक सादरीकरण करणार आहेत.

14  फेब्रुवारी रोजी आरती अंकलीकर -टिकेकर, कलापिनी कोमकली, राहुल देशपांडे, निषाद बाक्रे, देवकी पंडित, विनय रामदासन, गौतम काळे, रघुनंदन पणशीकर, मंजुषा पाटील, पंडित राजन मिश्रा, पंडित साजन मिश्र  इत्यादी मान्यवर सादरीकरण करणार आहेत.

दि. 14  फेब्रुवारी  रोजी  सकाळी साडेनऊ वाजता ज्येष्ठ नेते शरद पवार महोत्सवाला भेट देणार आहेत, तर दुपारी 4.30  वाजता केंद्रीय मंत्री प्रकाश  जावडेकर  यांची उपस्थिती व्हिडीओ संदेशाद्वारे असणार आहे.

पद्मभूषण पं. राजन आणि पं. साजन  मिश्रा यांच्या उपस्थितीत “खयाल यज्ञाचा” समारोप व वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमांचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती  संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष  गोविंद बेडेकर आणि सचिव मंजुषा पाटील यांनी दिली.

मिलिंद कुलकर्णी, राहुल सोलापूरकर आणि आनंद देशमुख हे या महोत्सवाचे निवेदन करणार आहेत.  सायंकाळी साडेचार वाजता  विधान परिषद उप सभापती डॉ. नी

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share