Pune News : पुणे-सातारा महामार्गावरील खेडशिवापूर टोलनाका बंद होणार नाही

एमपीसी न्यूज – पुणे-सातारा महामार्गावरील खेडशिवापूर टोल टर्मिनेट करण्यात आला आहे, अशी माहिती केंदीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी पुण्यात दिली होती. पण, हा टोल बंद होणार नसून रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) रिलायन्स इन्फ्राकडून स्वतःच्या ताब्यात घेणार आहे.

टोल टर्मिनेट होणार याचा अर्थ पुणे-सातारा रस्त्यावरील टोल बंद होणार नाही. तर खेड-शिवापूर टोलनाका काही काळासाठी रिलायन्स इन्फ्राकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे. खेडशिवापूर टोल नाका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण स्वतःच्या ताब्यात घेणार आहे. या कालावधीत कंत्राटदाराला म्हणजेच रिलायन्स इन्फ्राला टोलचे पैसे मिळणार नाहीत. पुणे-सातारा रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत टोलनाका NHAIच्या ताब्यात असेल.

रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा टोलनाका रिलायन्स इन्फ्राकडे देण्यात येईल. तसेच रस्त्याच्या कामासाठी खर्च झालेली रक्कम रिलायन्स इन्फ्राकडून वसूल करण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.