Pune News : किरीट सोमय्यांची पुण्यात पत्रकार परिषद, अजित पवारांवर केले सनसनाटी आरोप

एमपीसी न्यूज – अनिल परब, अनिल देशमुख नंतर 3 रा अनिल कोण याचा खुलासा मी गणपती विसर्जन झाल्यावर करेन..भावना गवळीचं समर्थन करणाऱ्या शरद पवार यांच्या बारामती पासून विसर्जनाला सुरुवात होईल असा गर्भित इशारा ही किरीट सोमय्या यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिला

पुणे दौऱ्याची सुरुवात मुळशी भागातील अनिल परब यांच्या कथित बेनामी प्रॉपर्टी पासून करून जरांडेश्वर कारखाना खरेदी विक्री घोटाळा प्रकरणी चर्चेत असलेल्या पुणे जिल्हा सहकारी बँकेला भेट देण्यापूर्वी सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत अनेक सनसनाटी आरोप केले

अनिल परब यांचं बेकायदेशीर रिसॉर्ट पाडायचं प्रतिज्ञापत्र ठाकरेंनी लोकयुक्तांनकडे दिलंय मग अद्याप ते मंत्रिमंडळात कसे? भावना गवळी यांनी 118 कोटींचा घोटाळा केला तरी शरद पवार समर्थन का करतायत ?राणेंचा जुहू मधील बंगला crz चं उल्लंघन करून बांधला असेल तर राज्य सरकारने जरूर कारवाई करावी

छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन प्रकरणी क्लीन चिट दिली असली तरी आगे आगे देखो होता है क्या म्हणत अंजली दमानिया किंवा अजून कुणी या निर्णयाविरोधात सुप्रीम।कोर्टात जात असेल तर आम्ही,आमचे फडणवीस नक्की मदत करतील अशा सूचक शब्दात भुजबळ यांच्या विरोधात पक्के पुरावे आहेत असा दावाही किरीट सोमय्या यांनी केला

नारायण राणें वर 300 कोटींचच्या घोटाळ्याचे आरोप केले ते केंद्रात मंत्री झाले…अजित पवारांवर सिंचन घोटाळा, राज्य बँक घोटाळा आरोप केले त्यांना घेऊन 72 तासांचे सत्कार स्थापन केले, उद्धव ठाकरेंवर टीका केली म्हणून गेल्या निवडणुकीत तिकीट कापले अशी शिक्षा तुमच्या चांगल्या कामाला का यावर।मिश्किल हसून राजकारणात एरर ऑफ जजमेंट असतं आपण न घाबरता घोटाळ्यांचा पर्दाफाश करतच राहणार असं सोमय्या म्हणाले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.