22.4 C
Pune
शनिवार, ऑगस्ट 13, 2022

Pune News : कोव्हिशिल्ड जगात सर्वप्रथम भारतीयांना : आदर पुनावाला

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज : कोव्हिशिल्ड लसीची तिसरी चाचणी अंतिम टप्प्यात आली आहे. जगात सर्वात आगोदर भारत नंतर आशिया खंडात कोव्हिशिल्ड लसीचं वितरण करणार, असल्याचा निर्धार सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी व्यक्त केला.

ते पत्रकारांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवाद साधताना पुनावाला पुढे म्हणाले, कोव्हिशिल्ड लशीच्या प्रगतीवर पंतप्रधान मोदी यांनी आज शनिवारी आनंद आणि समाधान व्यक्त केले आहे.

ही लस घेतल्यास 60 टक्क्यापर्यंत फरक पडतो, त्यामुळे रुग्णालयांमध्ये जेणे गरजेचे नाही. आणखी काही चाचण्या यशस्वी झाल्यानंतर येत्या काही दिवसांमध्ये ही लस भारतीयांसाठी बाजारपेठेत आणली जाईल.

पंतप्रधान मोदींना लसी संबंधीची खूप माहिती जाणून घेतली, तसेच मोदी विविध लसींबद्दल भरभरून बोलले. लसीकरणाच्या वितरणाचा प्लॅन तयार आहे. युरोपियन देशही ॲस्ट्रॉ झेनेकोवर लक्ष ठेऊन आहेत.

कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी 2 आठवड्यात परवान्यासाठी अर्ज करणार आहोत. लसीची तिसरी चाचणी अंतिम टप्प्यात आली आहे. जगात सर्वात आगोदर भारत नंतर आशिया खंडात कोव्हिशिल्ड लसीचं वितरण करणार आहोत, असेही पुनावाला यांनी यावेळी सांगितले.

spot_img
Latest news
Related news