Pune News : ‘सीरम’विरोधातील कुटिस बायोटेकची याचिका न्यायालयाने फेटाळली

एमपीसी न्यूज: कुटिस बायोटेक नामक कंपनीने ‘कोविशिल्ड’ या कोरोना लसीच्या नावावरून सीरम संस्थेच्या विरोधात दाखल केलेली याचिका पुणे सत्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता सीरमच्या लसीचे नाव ‘कोविशिल्ड’ हेच कायम राहणार आहे.

कुटिस बायोटेकने सीरम इन्स्टिट्यूटच्या विरोधात 4 जानेवारीस न्यायालयात याचिका दाखल केली होती. सीरम कंपनीच्या अगोदर कुटिसने ‘कोविशिल्ड’ या नावाचा वापर केला होता. त्यामुळे ‘कोविशिल्ड’ हे नाव कुटिसने वापरण्याचा हक्क त्यांच्याकडे असल्याचे याचिकेत म्हटले होते.

_MPC_DIR_MPU_II

दरम्यान, ॲड. हितेश जैन यांनी सीरम इन्स्टिट्यूटची बाजू न्यायालयात मांडली. न्यायालयाने दोन्ही कंपन्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि कुटिसने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली.

कुटिस कंपनीने आता या निर्णयाविरोधात हायकोर्टात अपील करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.