Pune News : कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज – राज्याचे कामगार, राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना आज (गुरुवारी) कोरोनाची लागण झाली आहे. महाविकास आघाडी सरकार मधील कोरोनाची लागण होणारे नववे मंत्री आहेत. याबाबतची माहिती पाटील यांनी स्वतः समाजमाध्यमाद्वारे दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे वळसे पाटील नेतृत्व करतात. कोरोना काळात सुरुवातीपासून ते फिल्डवर होते. आज त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. वळसे पाटील आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, नुकतीच माझी कोरोना चाचणी करण्यात आली असून, त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून कसलाही त्रास नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी दक्षता म्हणून कोरोनाची चाचणी करून घ्यावी आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन.

दरम्यान, यापूर्वी महाविकास आघाडी सरकारमधील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, परिवहन मंत्री अनिल परब यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी कोरोनावर मात केली आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनीही कोरोनावर मात केली आहे. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपचार घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.