Pune News : मुकाई चौक ते नवले पूलापर्यंत ठिकठिकाणी मोठ्ठे खड्डे ; अपघातांना निमंत्रण, प्रवाशांचे हाल

एमपीसी न्यूज – पुणे-बंगळुरु महामार्गावर मुकाई चौक ते नवले पूलापर्यंत ठिक ठिकाणी मोठ्ठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून, हे खड्डे अपघातांना निमंत्रण देत आहेत. अनेक दिवसांपासून असलेल्या या खड्ड्यांकडे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण दुर्लक्ष करत असून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

मुकाई चौक, भुमकर चौक, भुजबळ चौक, पाषाण, बाणेर, चांदणी चौक ते पुढे नवले ब्रिज परिसरात ठिकठिकाणी अनेक खड्डे पडले आहेत. महामार्गावरील या खड्ड्यांची खोली अधिक असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुचाकीचा चालकांसाठी तर हा मार्ग अधिक धोकादायक ठरत आहे.

या मार्गावर दररोज प्रवास करणारे स्थापत्य अभियंता मालोजीराजे पवार म्हणाले, ‘या मार्गावर मी नेहमी प्रवास करतो. रस्त्यात पडलेले खड्डे प्रवाशांसाठी मोठा चिंतेचा विषय आहे. काही ठिकाणी 9 इंच एवढे खोल खड्डे तयार झाले आहेत, त्यामुळे लहान – मोठे अपघात रोज पाहण्यात येत आहेत.’

‘काही दिवसांपूर्वी हिंजवडी येथून येत असताना एका गरोदर महिलेचे दुचाकीवरून झालेले हाल डोळ्याने पहावले नाहीत’, असे पवार म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.