Pune News : लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करणार

एमपीसी न्यूज – लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर या 16 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. सुरेखा पुणेकर यांनी स्वतः याबाबत एका व्हिडीओच्या माध्यमातून माहिती दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये सुरेखा पुणेकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सुरेखा पुणेकर यांनी प्रसारित केलेल्या व्हिडिओत असे म्हटले आहे की, ‘चित्रपट, कला, साहित्य, संस्कृतिक विभाग मुंबई अध्यक्ष मनोज व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या 16 सप्टेंबरला मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे. आतापर्यंत मी कलेची सेवा केली आता मला राजकारणात जनतेची सेवा करायची आहे, महिलांचे प्रश्न सोडवायचे आहेत. गोरगरिबांचे प्रश्न सोडवायचे आहेत. 16 सप्टेंबरला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मराठी सिने कलाकारांचे इनकमिंग सुरुच आहे. यापूर्वी गायक आनंद शिंदे, अभिनेता प्रियदर्शन जाधव ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, जेष्ठ अभिनेते विजय पाटकर यांच्यासह इतर कलाकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.