Pune News : जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील मृतांना सर्वपक्षीय नेत्यांकडून आदरांजली

एमपीसी न्यूज : बरोबर 11 वर्षांपूर्वी 13 फेब्रुवारी 2010 रोजी सायंकाळी 7.13 मिनिटांनी कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीत बॉम्बस्फोट झाला होता. त्यामध्ये 17 निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्या सर्व मृतांच्या स्मृतींना उजाळा देत सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि सजग नागरिकांकडून आदरांजली वाहण्यात आली.

कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरी येथे मेणबत्ती प्रज्ज्वलन करून पुष्पार्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

याप्रसंगी काँग्रेसचे नेते माजी आमदार मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, विद्यमान नगरसेवक उमेश गायकवाड, माजी नगरसेवक बाबू वागस्कर, काँग्रेसच्या नेत्या संगीता तिवारी, जर्मन बेकरी हॉटेलच्या मालक स्नेहल खरोसे, मेरे अपने संघटनेचे बाळासाहेब रुणवाल, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.