Pune News : महाराष्ट्रातील ज्यू अल्पसंख्य समुदाय प्रमुखांचा पुण्यात भाजप प्रवेश

एमपीसी न्यूज – ज्यू अल्पसंख्य समुदायाचे राज्यातील प्रमुख डॉ. डॅनियल पेणकर आणि पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सायंकाळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप पुणे शहर अल्पसंख्य आघाडीचे अध्यक्ष अली दारूवाला यांच्या विशेष प्रयत्नाने हा प्रवेश लाल देऊळ सिनेगॉग येथे पार पडला.

_MPC_DIR_MPU_II

शनिवारी (दि.16) हा कार्यक्रम पार पडला. यावेळी भाजप अल्पसंख्य आघाडी प्रदेशाध्यक्ष एजाज देशमुख ,शहराध्यक्ष जगदीश मुळीक , सरचिटणीस राजेश पांडे, पालिका सभागृह नेते गणेश बीडकर उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘भारतीय जनता पक्ष हा देशातील, जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. देशात भाजपाचे राज्य आहे. अशा पक्षा सोबत ज्यू समुदायाचे नाते जोडले जात आहे. ही आनंदाची गोष्ट आहे.पक्षाची सदस्य संख्या, जनाधार सतत वाढत आहे. पुढील लोकसभा निवडणुकीत मागील मताधिक्याचा विक्रम तोडला जाईल याची खात्री अशा कार्यक्रमातून होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपाशी ज्यू समुदाय सतत संबंधित राहिला आहे. आता प्रत्यक्ष कार्यरत होत आहे, ही आनंदाची बाब आहे. अल्पसंख्य समाजाचे प्रश्न भारतीय जनता पक्ष सोडवेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.